महाकवी भवभूती

 *13*

संस्कृत साहित्यांतले प्रसिद्ध अन्य नाटककार जेथे सहज, सोप्या, रसग्रहण भावनांचेच फक्त चित्रिकरण प्रस्तुत करतांत, तेथे भवभूती हृदयाला भिडणाऱ्या भावनांची सहज, सोप्या, रसग्रहण चित्रणासोबतच काव्यात्मक वर्णन नैपुण्य ही श्रृंखलाबद्ध कौशल्याने सादर करण्यांत यशस्वी झालेले आहेत. किंबहुना, भवभूतीच्या इतर नाटकांप्रमाणेच महावीरचरितममध्येही सूक्ष्मतम भावतरंग आणि नाट्यव्यापारांचे वर्णन आणि प्रकाशन एकात्मिक पद्धतीने साधले जाते. ते इतके प्रगल्भ आहे की सुहृदांचे हृदय नक्कीच आकर्षित होतात. अन्य नाटककारांच्या तुलनेत हे भवभूतीचे वैशिष्ट्य आहे.महाकवी भवभूती हे काव्यकला आणि नाटककला या दोन्ही विषयांत पारंगत आहेत आणि कालिदासांसारख्या महान कवींच्या पंक्तीत त्यांची गणना दुसऱ्या क्रमांकावर केली जाते. वीर, शृंगार आणि करुण रसप्रधान नाटके रचून, वेगवेगळ्या रसांसह नाटकांची रचना करणारे हे एक अद्वितीय कवी आहेत. महावीरचरितम् ही त्यांची मूळ निर्मिती आहे आणि तिचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या प्रतिभेने भवभूतींनी उपजीव्य रामायण कथेत असे विशेष बदल केले आहेत की रामकथेचे वेगळेच रूप पडद्यावर दिसते.

भारतीय संस्कृत नाट्यपरंपरेवर अनेकदा श्रृंगाररसाचे वर्चस्व राहिले आहे. महाकवी कालिदासांच्या तीनही नाट्यकृती - *‘विक्रमोर्वशीयम्, मालविकाग्निमित्र आणि अभिज्ञानशाकुंतलम्’* या शृंगार रस प्रधान आहेत. अशा परिस्थितीत परंपरेपासून दूर जात भवभूतींनी वीर, शृंगार आणि करुण रसप्रधान रचनांची निर्मिती करणे हे एक धाडसी पाऊल आहे. कालिदासानंतर काव्यकला आणि नाटककला या दोन्ही विषयांत निपुण असलेल्या कोणाचे नांव स्विकारले जात असेल तर ते भवभूतीचे स्थान आहे. कौशल्यपूर्ण आणि भावनेने ओतप्रोत वर्णने रचतांना भवभूती एकीकडे आपले पांडित्य दाखवतात, तर दुसरीकडे हृदय पिळवटून टाकणाऱ्या भावनांचे सूक्ष्म चित्र सादर करून आपली संवेदनशीलताही सिद्ध करतात

Comments

Popular posts from this blog

विश्वसंस्कृदिनम्